SiteLogo
Welcome to Shaikshanik Vyaspith, Malkapur
स्थापना - ५ सप्टेंबर २००१
• ज्ञान | प्रबोधन | सेवा •
रजि. क्रमांक - महाराष्ट्र/कोल्हापूर/एफ १८१९०

आमच्याविषयी

जाणून घ्या शैक्षणिक व्यासपीठा विषयी..!

संस्थेचे नाव- शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर
पत्ता- मुक्काम पोस्ट- मलकापूर तालुका - शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर ४१५१०१
स्थापना- ५ सप्टेंबर २००१
रजि. क्रमांक- महाराष्ट्र/कोल्हापूर/एफ १८१९०
संस्थापक- श्री विनायक सुहास हिरवे, प्राथमिक शिक्षक
सदस्य संख्या - ११३५ ( सामाजिक सेवा आवड असलेले)
कायमस्वरूपी आश्रयदाते- ४१

संस्था परिचय

या संस्थेची स्थापना २००१ मध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून झाली. प्राथमिक शिक्षकांनी संवेदनशीलतेचा विचार करून आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा घेऊन ही संस्था सुरू केली. ज्ञान, सेवा आणि प्रबोधन या त्रिसुत्रीवर विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि शिक्षकांचा विकास हा मुख्य उद्देश होता. गेल्या २३ वर्षांपासून संस्था उपलब्ध कार्यकर्ते, आर्थिक मदत आणि परिस्थितीचा विचार करून कार्यरत आहे.
समाजातील चांगुलपणा ओळखून त्याचे कौतुक करण्याची संधी व्यासपीठ नेहमीच शोधत असते. दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व्यासपीठ स्वयंस्फूर्तीने कार्यरत आहे. समाजातील दानशूर दाते आणि गरजू विद्यार्थ्यांमध्ये मदतीचा संबंध निर्माण करून विश्वासार्ह कार्य करण्याची संधी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात कार्यरत असूनही, संस्थेने आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक मदत विविध माध्यमांद्वारे समाजातील अनेक गरजू स्तरांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. आदरणीय इंद्रजित देशमुखसाहेब यांच्या प्रेरणेमुळे संस्थेचे कार्य सुरू आहे.

संस्था कार्यकारिणी

संस्थेचे संस्थापक

श्री.विनायक सुहास हिरवे​

नोकरी- प्राथमिक शिक्षक, विज्ञान विषयशिक्षक

शैक्षणिक पात्रता- एम.ए डी.एड ,बी. एड., शालेय व्यवस्थापन पदविका

आत्तापर्यंतच्या सेवा शाळा –

  • जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत विद्या मंदिर वरीलगाव (कडवे)
  • कन्या विद्या मंदिर, मलकापूर
  • विद्या मंदिर करुंगळे, ता.शाहूवाडी
  • केंद्रीय प्राथमिक शाळा, वारूळ जिल्हा – कोल्हापूर

 

प्राप्त सन्मान –

  • महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार-२०१८
  • जिल्हा परिषद कोल्हापूरचा शिक्षक पुरस्कार-२०१७
  • मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार
  • मासिक ऋग्वेद,आजरा कडून उत्कृष्ट शिक्षक सामाजिक कार्यकर्ता सन्मान
  • रोटरी क्लब कडून नेशन बिल्डर पुरस्कार
  • राज्य सेवाभूषण पुरस्कार (पत्रकार संघ)
  • राष्ट्रीय कार्यगौरव सन्मान (काव्यमित्र संस्था)
  • राज्यस्तरीय ज्ञानज्योती अवॉर्ड (आविष्कार फाऊंडेशन)
  • इतर अनेक संस्थाकडून सन्मान.
  • मलकापूर शहरासाठी स्वच्छता दूत (Brand Ambassador) म्हणून सन्मानाची निवड.

"मी सध्या केंद्रीय प्राथमिक शाळा वारूळ येथे विज्ञान विषय शिक्षक म्हणून काम पाहत असून विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक पारितोषिके मिळवली आहेत. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जनरल चॅम्पियन्सशिप मिळवली आहे. आत या ज्ञानासाठी , बाहेर जा सेवेसाठी 'या उद्देशाने सामजिक संवेदना जागवणारे शिक्षण प्रक्रिया असावी असा जगण्याचा स्थायीभाव.
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक , विविध तालुका ,जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून काम पाहिले असून महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या चर्चासत्रामध्ये पुढाकार इस्रो अभ्यास सहल, वाचन पेटीतून वाचू आनंदे , परिसर भेट यासारखे असंख्य उपक्रम सुरू केले. शैक्षणिक गुणवत्ता , विद्यार्थी विकास हा ध्यास घेऊन शिक्षण सेवेचे व्रत स्वीकारले आहे"

-श्री.विनायक सुहास हिरवे

  प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक व्यासपीठाचे कायमस्वरूपी आश्रयदाते

यादी पहा

शैक्षणिक व्यासपीठ विद्यार्थी पालकत्व योजना

यादी पहा

आमच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हा.

आमच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये आपला खारीचा वाटा देणगी स्वरूपात दान करा.